Ad will apear here
Next
पोटली
NRI गल्फी गंध- जोडती सोळा वर्षांनी मायदेशी बंध. या पोटलीत! (पोतडीत)...साल 2000 ते 2016 ह्या कलावधीतील गल्फी लाईफच्या स्वानुभव आठवणींची रेखाचित्रे, किस्से, पंचवीस देशांच्या सफरीचे भटकंती चित्र सापडेल. हे अनुभव कधी आखाताच्या वास्तवाचे सत्य समजून घेण्यास तर कधी परदेशातील नुसत्याच भुलवणाऱ्या वैभवाच्या आहारी न जाता आयुष्याचे ध्येय गाठण्यास मार्गदर्शक ठरतील.

त्यानुसार प्रयत्नांची दिशा ठरवत आवश्यक तेवढं बचतीचं उद्दिष्ट गाठून, सगळ्या आघाड्यांवर यशस्वी ठरत, एका आनंदी आयुष्याचा आयाम उलगडत जाईल. परदेशी वास्तव्य त्यातील सुखांपलीकडील धोके आणि भारतात सुखेनैव परतीची वाट चोखंदळयासाठी हे अनुभवकथन जणू वस्तुपाठ बनू शकते. पैसे कमवणे, गमवणे, कधी यश, अपयश ह्या ऊनपावसाच्या खेळात तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावरील इंद्रधनुष्य सप्तरंगी होण्यासाठी वयाच्या चाळिशीनंतर विचारांची दिशा महत्त्वाची ठरते.






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZPOBE
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language